"शहरवासी वनवासी आम्ही सारे भारतवासी. "

रानभाज्या प्रदर्शन २०२५

रानभाज्या प्रदर्शन  २०२५

गुरुवार दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी आश्रमशाळेचे पूर्वनियोजित ‘रानभाज्या प्रदर्शन’ शाळेत संपन्न झाले. सदर  प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांचे एकूण 30 पालक रानभाजी घेऊन सहभागी झाले होते. तसेच प्रदर्शनात एकूण २० प्रकारच्या रानभाज्या पालकांनी आणल्या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव तालुका कृषी अधिकारी श्री.रविकिरण पडवळकर साहेब उपस्थित होते . तसेच या प्रदर्शनासाठी शाळेच्या संकुल समितीचे माननीय सहसचिव श्री.नितीन चांदोरकर व श्री.रविंद्र पाटील सर आणि शालेय शिक्षण समितीचे सदस्य श्री.लक्ष्मण जंगम सर व सौ.प्रतिभा पोळेकर मैडम तसेच व.क.आ रायगड जिल्ह्याचे सचिव श्री.मनोज कामत आवर्जून उपस्थित होते. रानभाज्या घेऊन आलेल्या पालकांनी आपण आणलेल्या भाजीची सविस्तर माहिती उपस्थिताना सांगितली. प्रमुख पाहुणे  श्री. रविकिरण पडवळकर साहेब  यांनी आपल्या भाषणात हा उपक्रम शाळेत आयोजीत केल्याबद्दल शाळेचे भरभरून कौतुक केले व पुढील उपक्रमासाठी शुभेछा दिल्या. या प्रदर्शनातील विशेष बाब म्हणजे सुधागड तालुक्यातील पालक श्री.गोविंद लेंडी यांनी एकूण १७ प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या.  कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक , कर्मचारी व संस्था प्रतिनिधी यांनी पालकांनी आणलेल्या रानभाज्या विकत घेतल्या.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Magic Moments Early Learning

Received overcame oh sensible so at an. Formed do change merely.

Category

Latest posts

Tags

    Contact Info

    Vanvasi’s are the Tribal people living since long time away from cities; especially they live in jungle, hilly mountain areas and valleys since so many decades. “Vanvasi Kalyan Ashram” works for upliftment of these people.

    Edit Template

    About Our School

    Vanvasi’s are the Tribal people living since long time away from cities; especially they live in jungle, hilly mountain areas and valleys since so many decades. “Vanvasi Kalyan Ashram” works for upliftment of these people.

    Contact Us

    © 2025 , Vanvasi Kalyan Ashram, Maharashtra (Kokan Prant)