शाळेचा 26 वा वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक 4 डिसेंम्बर ते 6 डिसेंम्बर 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
रानभाज्या प्रदर्शन २०२५
रानभाज्या प्रदर्शन २०२५ गुरुवार दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी आश्रमशाळेचे पूर्वनियोजित ‘रानभाज्या प्रदर्शन’ शाळेत संपन्न झाले. सदर प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांचे एकूण 30 पालक रानभाजी घेऊन सहभागी झाले होते. तसेच प्रदर्शनात एकूण २० प्रकारच्या रानभाज्या पालकांनी आणल्या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव तालुका कृषी अधिकारी श्री.रविकिरण पडवळकर साहेब उपस्थित होते . तसेच या प्रदर्शनासाठी शाळेच्या संकुल समितीचे माननीय सहसचिव श्री.नितीन चांदोरकर व श्री.रविंद्र पाटील सर आणि शालेय शिक्षण समितीचे सदस्य श्री.लक्ष्मण जंगम सर व सौ.प्रतिभा पोळेकर मैडम तसेच व.क.आ रायगड जिल्ह्याचे सचिव श्री.मनोज कामत आवर्जून उपस्थित होते. रानभाज्या घेऊन आलेल्या पालकांनी आपण आणलेल्या भाजीची सविस्तर माहिती उपस्थिताना सांगितली. प्रमुख पाहुणे श्री. रविकिरण पडवळकर साहेब यांनी आपल्या भाषणात हा उपक्रम शाळेत आयोजीत केल्याबद्दल शाळेचे भरभरून कौतुक केले व पुढील उपक्रमासाठी शुभेछा दिल्या. या प्रदर्शनातील विशेष बाब म्हणजे सुधागड तालुक्यातील पालक श्री.गोविंद लेंडी यांनी एकूण १७ प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक , कर्मचारी व संस्था प्रतिनिधी यांनी पालकांनी आणलेल्या रानभाज्या विकत घेतल्या.
प्रवेशोत्सव २०२५
सोमवार दिनांक १६ जून २०२५ नवागतांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमास आदिवासी विकास विभाग कार्यालय पेण चे श्री.क्रांती पाटील साहेब उपस्थित होते. तसेच संस्था पदाधिकारी सौ.पोळेकर मैडम, पालक व शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Yoga Day 21st June 2025
Yoga Day Celebrated in School. Hon.Mrs. Polekar Madam took yoga session.
MESSAGE FROM THE PRINCIPAL’S DESK
“Empowering Tribal Communities for a Brighter Future” At Vanvasi Kalyan Ashram, our mission is to uplift and empower tribal communities through education, healthcare, skill development, and cultural preservation. For over seven decades, we have dedicated ourselves to fostering self-reliance, preserving traditions, and creating opportunities for a better future. Our efforts are rooted in the belief that every individual, regardless of their background, deserves access to quality education, healthcare, and economic opportunities. Through our various programs, we strive to bridge the gap between tradition and progress, ensuring that our Vanvasi brothers and sisters thrive while maintaining their rich cultural heritage. I extend my heartfelt gratitude to all our supporters, volunteers, and well-wishers who contribute to this noble cause. Together, we can continue to make a lasting impact and build a more inclusive, empowered society. [Uttam Raman Patil]Principal, Vanvasi Kalyan Ashram Ram Ram…….